Sakal Unplugged With Manasi Naik 'माझी मुलींना हात जोडून विनंती...' ,लग्नाच्या फसवणूकीवर मानसी नाईक स्पष्टच बोलली

0 意见· 11/26/22

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी अभिनेत्री मानसी नाईकचं नाव चर्चेत आहे,ते तिच्या घटस्फोटामुळे. एरव्ही नवऱ्यासोबत वेगवेगळ्या रील्स सोशल मीडियावर अपलोड करत आकंठ प्रेमात बुडालेल्या मानसीच्या आयुष्यात असं घडलंच कसं हा प्रश्न तिच्या चाहत्यांनाच नाही तर अनेकांना पडला. सुरुवातीला अफवा असेल असं वाटत असताना स्वतः मानसीनं आपण आपला पती बॉक्सर आणि मॉडेल प्रदीप खरेराला घटस्फोट देत आहोत या बातमीवर शिक्कामोर्तब केलं. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत तिनं घटस्फोटाचं कारण सांगत अनेक तरुण मुलींना लग्न करताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्या,मी जिथे चुकले तसं तुम्ही करु नका असं आवाहन केलं आहे.

显示更多

 0 注释 sort   排序方式


下一个