This episode is age restricted for viewers under +18

Create an account or login to confirm your age.

शांता शेळके रचित दास्य भक्ती श्री समर्थांची

0 Views· 08/19/23
Dipali 's Podcast
Dipali 's Podcast
0 Subscribers
0

एका मित्राच्या मार्फत अचानकपणेच आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री कै. श्रीमती शांताबाई शेळके यांनी श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांवर रचलेली ही पंधरा श्लोकांची काव्यरचना वाचनात आली.
प्रथम वाचनातच मन भरुन आले. प्रत्येक श्लोकातुन श्रीमती शांताबाईंनी ज्यापध्दतीने श्रीसमर्थांच्या अवतारकार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा, शिकवणीचा अनुबंध काव्यबध्द केला आहे तो वाचुन श्रीमती शांताबाईंबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
त्यांच्या असामान्य प्रज्ञेचे व प्रतिभेचे तसेच त्यांच्या सखोल व्यासंगाचे, सजग व संवेदनशील जीवनवृत्तीचे व उदात्त आदर्शांप्रतीच्या भक्ती व विनम्र भावाचे दर्शन या शब्दा शब्दांमधुन घडते!
एखाद्या प्रतिभावंत व अग्रगण्य कलावंताची कलाकृती कशी सर्वाथाने उच्च दर्जात्मक गुणवत्ता राखणारी असते याचे उदाहरण म्हणजेच हे काव्य होय.

*दास-भक्ती*

जया अंतरी पूर्ण श्रीराम भक्ती।
जया रामनामी मिळे दिव्य शक्ती।
जये गाइली आदरे रामगाथा।
नमस्कार माझा तया श्री समर्था॥१॥

जरी राहीला डोंगरी दास दूर।
जनांचा दिसे वाहता त्यास पूर।
दिसे दैन्य दारिद्रय अज्ञान चिंता।
नमस्कार माझा तया श्री समर्था॥२॥

तुम्ही जागविला महाराष्ट्र धर्म।
कळे भक्तीचे युक्तीचे मुख्य मर्म।
तुम्ही जीवना लोकप्रवृत्त केले।
प्रपंचातले सार सिद्धीस नेले॥३॥

प्रपंची असावे कसे सावधान।
असावे तरी नित्य अध्यात्म भान।
तुम्ही दाविली जीवनाची इयत्ता।
नमस्कार माझा तुम्हा श्री समर्था॥४॥

जये देव बंदीतूनी सोडविले।
नव्या राजधर्मा जगी रुढविले।
प्रजा पालनी जो सदा दक्ष भारी।
तुम्हा पूज्य तो राम कोदंडधारी॥५॥

असे शक्ति संपन्न तो वायुपुत।
हनुमंत जो श्रेष्ठ श्रीराम दूत।
असे भव्य उत्तुंग जो बुद्धिदाता।
आम्हा दैवत: त्या दिले श्री समर्था॥६॥

विवेकासवे जेथ चातुर्य आहे।
प्रपंचातली जेथ जाणीव आहे।
जिथे आत्मभावासवे नितिमत्ता।
तया "दासबोधा" स्मरु श्री समर्था॥७॥

मनाचे तुम्हा पूर्ण चांचल्य ठावे।
तुम्हा इंद्रियांचे तसे ज्ञात गोवे।
तया संयमाने कसे आकळावे।
तुम्हा कारणे ते आम्हाला कळावे॥८॥

तुम्ही सुंदराचे दिले सूक्ष्म भान।
दिली लोचना कोवळी रम्य जाण।
निर्सगातली चेतना जाणविली।
नवी प्राणशक्ती तुम्ही बाणवीली॥९॥

तुम्ही उग्र वज्रापरी पेटणारे।
तुम्ही कोवळे अंतरी भेटणारे।
विवेकी विरागी तुम्ही सत्त्वधारी।
तुम्ही जाणते लोक कल्याणकारी॥१०॥

तुम्ही सर्व जाणून सर्वा अतीत।
जना संगती आयु केले व्यतीत।
तुम्ही सर्वदा वाहिली विश्वचिंन्ता।
नमस्कार माझा तुम्हा श्री समर्था॥११॥

कधी अंतरी या वियोगार्त दाटे।
उभा सर्व संसार निस्सार वाटे।
क्षणी त्या सखा एक श्रीराम दाता।
तुम्ही जाण आम्हा दिली श्री समर्था
॥१२॥

असे रामदाता, असे राम घेता।
असे रामभोक्ता, असे भोगविता।
पहावे मनी नित्य त्या साक्षीभूता।
तूम्ही जाण आम्हा दिली श्री समर्था
॥१३॥

उदासिनता अंतरी नित्य राहो।
मना राघवाचा सदा घेई लाहो।
तया वाचुनी अन्य कोणी न त्राता।
तुम्ही जाण आम्हा दिली श्री समर्था
॥१४॥

समर्था तुम्हा अंतरी आठवावे।
तुम्ही बोलीला ते मनी साठवावे।
आता ठेविते पाऊली नम्र माथा।
नमस्कार माझा तुम्हा श्री समर्था
॥१५॥

— कै. श्रीमती शांताबाई शेळके.
युगबोध—श्रीसमर्थ रामदास         विशेषांक  दिवाळी अंक २००२ यातुन साभार.तुमची किंमत ठरवणारी कथा

Show more

0 Comments sort   Sort By